गुमगावच्या आठवडी बाजारात नाही शौचालयाची सोय | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media

2021-04-28 74

गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या प्रदुर्भावात शासनाच्या परवानगीने सुरू झालेल्या आठवडी बाजाराचे आर्थिक चक्र हळूहळू पूर्वस्थितीत येत आहे. परंतु, दर रविवारी भरत असलेल्या आठवडी बाजाराला लागलेला समस्यांचा आजार मात्र आजही कायम असल्याचे चित्र आहे. बाजारात असलेल्या शौचालय व मुत्रीघराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने व्यावसायिक, ग्राहकांसह महिलांची आणि तरुणींची फार मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर आठवडी बाजारातील शौचालय आणि मुत्रीघराची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
(व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires